चूल

इच्छाशक्ती विझून गेलेली असते. ती चूल पुन्हा पेटवायची असते.

मग शाईन काढायची. वाडीतून हायवेला लागायचं. हळूहळू जात राहायचं. बाजूने वर्दळ असते. प्रवरा ओलांडायची. दोन्ही बाजूने ऊस – गवत. मग पश्चिमेकडे असं गुलाबी तांबड आभाळ आपल्याकडे बघणार. दूरपर्यंत आभाळाचे वेगवेगळे आकार, पट्टे. खांडगावचं डोंगर. बरोबरीनेच काही धूसर दिसणाऱ्या छोट्या मोठ्या टेकड्या. बस जात राहायचं. यात खूप वेळ राहता येत नाही. आपण वाहत जातो विचाराकडे.


इच्छा पाहिजे तर कारण किंवा नाईलाज पाहिजे. काहीच नसतं. ही परिस्थिती का निमार्ण झाली?
नाईलाज भूकंपानेच येईल. कारण आपण निवडतो.

आजकाल असं वाटतं की माणसाला पर्याय असले की तो खरोखर स्वातंत्र्यात असतो. याची गंमत अशी की एक निवडलेल्या पर्यायाला बाकी डझनभर नाकारलेले पर्याय पछाडू लागतात. ते भूत होऊन मागे लागतात.

साल्या आम्हाला मारून तू जगणार असं वाटतं तुला? अजिबात नाही.

ह्या भूतांना मुक्ती तेव्हाच मिळणार जेव्हा तो निवडलेला पर्याय जगेल. खूप खूप.

आपला निर्णय चुकला असं बोलायला लागू नये हेच सर्वात मोठं इच्छाशक्ती निर्माण करणारं कारण ठरू शकतं.

निर्णय बरोबर ठरवण्याचाच डोंगर सर करायचा असतो इथे.

नाईलाज बरा आहे. त्याकडे ही निवडणूक नसते. तो थेट हुकुमशहा असतो. नाईलाज प्रत्येक गोष्ट नियंत्रित करत असतो. इच्छा , आकांक्षा. काय म्हणाल ते. यात भूत वैगेरे काही नसतं. फक्त मृत्यू. त्यानंतर आफ्टर लाईफ म्हंजे एक भयाण दूर दूर पर्यंत जाणारी पोकळी. तुम्हाला काही अस्तित्वच नाही. त्या पोकळीत जायचं नाही. या भीतीतून इच्छाशक्ती पेटत राहते.

एकतर भूतं नाहीतर भीती.

इच्छाशक्ती अशीच येतेच फक्त?
अर्थात नाही.

खरंतर इच्छा जेव्हा विझते वा आपल्याला ती नसते. हे जे काही होतं ते बहुतांश आपल्याला नकोस वाटणारं करतानाच होतं. इच्छा न होणे.

डझनभर पर्यायातून जरी आपण एक निवडत असलो तरी ते पर्याय आपल्यापुढे दुसरा कुणीतरी ठेवत असतो. आपण आपला स्वतःचा तेरावा पर्याय ठेवून तो निवडू शकत नाही. ही ती दुनियादारी.

हे असं स्वातंत्र्य असतं आपलं.

घरी जायला दूर रस्ता घेऊ वाटतो. अजून चुल पेटली नाही.

कुठे हे सगळं बुडायला लागलं असं वाटू लागतं. आठवून बघायचा प्रयत्न. आपलं आजच व्हर्जन इतकं नकारात्मक आणि दुःखी का झालं? कुठला तो क्षण होता?

दुःख खूप खाजगी गोष्ट आहे. कोरोनाने ती सामाजिक झाली. कित्येक लाख लोक मेली. त्यांसाठी कित्येक लोकांनी अश्रू ढाळले असतील. पण ह्या ग्रँड स्केलवर दुःख फक्त आणखी एक जणाच दुःख होतं. पण तीव्रता तेवढीच आहे.

आपण फक्त आणखी एक दुःखी व्यक्ती होतो जगात.

जग आपल्याभोवती भिरत नाही.

पुढे काय?
म्हाळुंगी ओलांडून घरी परतायचं.
कितीही ओझं वाटत असली तरी ती हाताने डोंगर पोखरतोय असं वाटणारी ती कामं करत रहायची.
कारण शोधायचं, नाईलाज पत्करायचा.
ह्या तश्या निरर्थक प्रवासात अर्थ असणाऱ्या ठिकाणी दोन क्षण काढायचे.
चूल पेटवायाची‌.
पोटाची खळगी भरायची.
सगळी उठाठेव त्यासाठीच.

© परिक्षित

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s