तुझ्याविना राणी

तुझ्याविना राणी मजला प्रीत कळली नसतीतुझ्याविना राणी सुख नसते कधी माझ्या सोबती तुझ्याविना राणी फुलांचे मळे ओस पडले होतेतुझ्याविना राणी ते सारे कळीत दडले होते तुझ्याविना राणी चंद्राला कोडे पडत राहीतुझ्याविना राणी चांदण्या किती तरी नक्षत्र का पडत नाही? तुझ्याविना राणीसुकत नाही अश्रू ह्या डोळ्यातलेतुझ्याविना राणी फिके पडे रंग सारे इंद्रधनुतले तुझ्याविना राणीकिती शोधले मी घर, तुला सांगू काही?तुझ्याविना राणीकुठलेच छप्पर माझे आकाश बनले नाही. परिक्षित – ०१/०४/२०२० तुझ्याविना राणी वाचन सुरू ठेवा

खूप प्रेम

तू गेल्याच कळलं तेव्हा सकाळ झाली होती.मी नेहमीप्रमाणे तुझ्या खोलीत आलो तेव्हा ती अनपेक्षितपणे रिकामी होती. खोटं बोलणार नाही पण मी क्षणभर गडबडलेलो. सावरुन पलंगाजवळ गेलो. मला आठवलं, तुझं बोलणं.‘निरोप निभावता येतो, पण पूर्वार्ध छळतो.’आणि तू मला कदापि छळणार नाही हे मला ठाऊक आहे.उशीखाली तुझं पत्र होतं. विटकरी रंगाच्या लिफाफ्यात.मी घाईघाईतच उघडलं. सॉरी. लिफाफा फाटला.दोन शब्द लिहिले फक्त तू.‘खूप प्रेम.’त्या छोट्याशा चिटोरीवर तू तुझं फेवरेट अत्तर सांडवलं म्हणून नाहीतर मला रागच आला असता. ‘खूप प्रेम.’किती विचारलं तर खूप. खूप म्हंजे किती ते सांगता येणार नाही इतकं प्रेम. खूप प्रेम. दोन्हींची व्याख्या करता येते नाही. अनुत्तरित, अपरिभाषित.मी ती उशी भिंतीला लावली … खूप प्रेम वाचन सुरू ठेवा

द मेमरी पॅलेस

बोलून टाकलं पाहिजे. टाकलं पाहिजे. कुठेतरी. अगदी भिंतीवरही बोलून टाकता येतं. चार भिंत असलेली खोली. एक भिंतीला दरवाजा आहे तर विरुद्ध बाजूला चौकोनी खिडकी. त्यातून येतो प्रकाश तर कधी सावल्या. त्या भिंतींवर बोलून टाकलं पाहिजे. त्यावर डोक्यात असलेले सिनेमे रंगवले पाहिजे. आय विल फाईंड यू अॅन्ड आय विल ‌किल यू! – असं फोनवर व्हिलनला तिळपापड होत धमकी देणारा हिरो. त्यावर कपटी टिपिकल हसणारा व्हिलन.हे एकतर वॉश बेसिनपाशी उभा राहून आरश्यात बघून हिरो बोलतोय किंवा एखाद्या पुलावर पालिकेच्या लालसर उजेडात उभं राहून. मागे बुलेट वैगेरे. याच पॉईंटला असंही होऊ शकतो की व्हिलन कोण आहे याचा उलगडा होता. मग तो शॉक! पराभव. … द मेमरी पॅलेस वाचन सुरू ठेवा

मिस्टर ब्लू

BoJack Horseman Finale टाॅड, प्रिन्सेस कॅरोलीन आणि डायेन. बोजॅकच्या आयुष्यातील तीन constant. प्रत्येकाला निरोप देतोय तो. निरोप म्हंजे पुन्हा भेटी गाठी नाही असं नेहमी नसतंच. कुणाच्या वर्तुळातून जागा आटत जाते वेळेबरोबर. बदल होतो. हे तिन्ही सीन त्या वर्तुळाचा परिघावरले आहेत. यानंतर तिघेही वर्तुळाबाहेर. डायेन….त्याच्या आयुष्यात उलथापालथ करून टाकणारी. बोजॅक एका पोकळीत अकारण फिरत असतो आणि मग ती येते याच्या आयुष्यात. त्याला जाणीव होते. त्यातून बाहेर येण्यासाठी त्याला तिच्यातच आधार दिसतो. त्याचं हा आधार म्हंजे प्रेम वाटणं. नात्यात बांधलेली डायेन हिची यावर बाजू अस्पष्ट राहते. पण बोजॅकला मात्र तिच्याकडून प्रमाणपत्र हवं असतो की सगळ्या त्याच्यात एवढ्या उणीवा असून तो देखील एक … मिस्टर ब्लू वाचन सुरू ठेवा

Conversation 01: Movie Date.

He: “Hey, you want to catch a movie or something?” She: “Are you asking me on a date?” He: “No.” She: “Yeah? Just two of us?” He: “Yes.” She: “Then it’s a date!” He: “No, it’s not. It’s just you and me catching a movie, and then maybe dinner or something, both of my choice..we will eat Indian food. Not something kind of western or unpronounceable dishes..they taste like garbage” She: “Still sounds like a date..” He: “No that’s hanging out..ok dinner cancelled..forget about it.. we’ll eat Panipuri.” She: “Why Panipuri..?” He: “Because you’re a girl & north Indian.. double-check.” … Conversation 01: Movie Date. वाचन सुरू ठेवा

I hate the fact

I hate the fact I hate the fact that I can’t be anything I want I hate the fact that I can’t share my passion with anyone I want I hate the fact that I can’t stand my ground to decisions I made I hate the fact that I can’t bind my courage to be the words I said I hate the fact that I can’t walk on pieces of broken dreams without shading a blood I hate the fact that I can’t make up for the time I lost doing the things that I was no good I hate … I hate the fact वाचन सुरू ठेवा

चूल

इच्छाशक्ती विझून गेलेली असते. ती चूल पुन्हा पेटवायची असते. मग शाईन काढायची. वाडीतून हायवेला लागायचं. हळूहळू जात राहायचं. बाजूने वर्दळ असते. प्रवरा ओलांडायची. दोन्ही बाजूने ऊस – गवत. मग पश्चिमेकडे असं गुलाबी तांबड आभाळ आपल्याकडे बघणार. दूरपर्यंत आभाळाचे वेगवेगळे आकार, पट्टे. खांडगावचं डोंगर. बरोबरीनेच काही धूसर दिसणाऱ्या छोट्या मोठ्या टेकड्या. बस जात राहायचं. यात खूप वेळ राहता येत नाही. आपण वाहत जातो विचाराकडे. इच्छा पाहिजे तर कारण किंवा नाईलाज पाहिजे. काहीच नसतं. ही परिस्थिती का निमार्ण झाली?नाईलाज भूकंपानेच येईल. कारण आपण निवडतो. आजकाल असं वाटतं की माणसाला पर्याय असले की तो खरोखर स्वातंत्र्यात असतो. याची गंमत अशी की एक निवडलेल्या … चूल वाचन सुरू ठेवा

अंकुर

होतंय काय आपण चमत्काराचे भक्त असतो. चमत्कार होईल ही येडी आस आपल्याला पार तल्लीन करुन टाकते. पण आयुष्य म्हणावं तितकं नाटकीय किंवा ड्रॅमाटिक नसतंच कधी. म्हंजे आभाळातून थाॅर येतो आणि लगेच अवेंजर जिंकायला लागतात असं होतच नाही, बहुतेकदा. मुळात हा फिल्मीपणा फार घातकी आहे. सर्वांचं आयुष्य वरच्या टप्प्यात सुरु होत नाही. इथे तर पहिलं हे स्पष्ट करावं वाटतं की ‘there is nothing fair in this world’ . हाही एक जबरदस्त काटा आहे – तुलना. त्याबद्दल कधीतरी नंतर. तर बऱ्याच लोकांसाठी प्रवास हा चढताच असतो. संघर्ष असतो. तो चालूच राहतो. हळूहळू लोक एकेक टप्पा पार पाडतात आणि वर जाऊ लागतात. पण … अंकुर वाचन सुरू ठेवा

डायलॉग

Previously: मदर आॅफ पर्ल २. सगळे दिवस सारखे नसतात. काही दिवस आपण उंच डोंगरावर असतो. आजूबाजूला कापसासारखे ढग असतात. इकडून तिकडे वाहणारे. आपण त्या वातावरणात इतके रमतो की त्या ढगांवर तरंगतच रहावं वाटतं. तर काही दिवस आपण पठारावर असतो. जो अगदी क्षितीजाला जाऊन संपणारा असतो. आपण तिथे चालू लागलं की मग लक्षात येतं की तो चढ आहे पण लक्षात न येणारा. तो चढत राहताना मग कधी झाड येतं तर कधी चक्क पाऊस देखील येतो. पण इथे तरंगत नाही माणूस चालत राहतो. वेड्यासारखा. अंत नाहीच. कधी कधी वाटतं की थांबवं. त्याने काहीच फरक पडत नाही. तसा चालत राहिल्याने कुठे काय फरक … डायलॉग वाचन सुरू ठेवा

मदर ऑफ पर्ल

१. त्याची पल्सर कंपाऊंड मध्ये आली तेव्हा ती नेहमीप्रमाणे तिच्या भावासोबत बॅडमिंटन खेळत होती. त्याने फक्त नजर टाकली. व त्याची गाडी जाऊन थांबली ती थेट पार्किंग मध्ये. तो आणि त्याचा रुममेट रोहन दोघेही उभे होते. लिफ्टसमोर. रोहनचे डोळे पेंघुळलेले, पाठीवर बॅग, दोन्ही कानात इयरफोन. तर तो एका हातात हेल्मेट आणि एक हातात बॅग घेऊन. लिफ्ट आली तेव्हा ती ही आली. घामाघूम. तिचा भाऊ मात्र तिकडेच दुसऱ्या कुणातरी बरोबर खेळत बसला. लिफ्टमध्ये पूर्ण लक्ष तिचं मोबाईल मध्ये होतं. लिफ्ट पाचव्या मजल्यावर थांबली. तिघेही बाहेर. दोघे उजव्या बाजूच्या फ्लॅटमध्ये गेले तर ती डाव्या बाजूच्या. रोहन आला तसा बिछान्यात जाऊन पडला. पण हा? … मदर ऑफ पर्ल वाचन सुरू ठेवा